चाकण | नाणेकरवाडीतील तरुण चाळीसगावात पिस्तुलासह अटक

July 12, 2024


चाकण | - रात्रगस्ती दरम्यान चाळीसगाव बस स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या प्रवासी तरुणाकडून गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. चाकण जवळील नाणेकर वाडी येथून संबंधित तरुण चाळीसगाव येथे गेला होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली. चाळीसगाव शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुस, एक मॅगझिन , दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.गणेश तुकाराम पवार ( सध्या रा. नाणेकरवाडी चाकण ता. खेड, मूळ रा. संभाजी नगर ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.


Recent Entertainment News

More Entertainment News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue