रोहकल | विजेच्या धक्क्याने जेष्ठाचा मृत्यू

July 16, 2024


खेड | पुणे लाईव्ह | -वीज वितरणच्या भोंगळ कारभाराने आणखी एक बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहकल ( ता. खेड ) येथे शेतात गेलेल्या ७० वर्षीय व्यक्तीच्या अंगावर विजेची प्रवाहित तार पडली. यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भगवंत लक्ष्मण शिंदे वय 70 रा. रोहकल ता.खेड,जि.पुणे असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रोहकल येथे शेतात विद्युततारा अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलीस ठाण्यात या बाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्याची कार्यवाही सुरु होती. या बाबतचा पुढील तपास सुरु आहे. --------------


Recent Politics News

More Politics News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue