बिरदवडी | भरधाव डम्परची दुचाकीस धडक; पत्नी ठार; पती जखमी

July 16, 2024


खेड |- भरधाव डम्पर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती जखमी तर पत्नीचा मृत्यू झाला. सदरचा अपघात भाम नदी ते बिरदवडी रस्ता भागात झाला आहे. कुसुम नाथा गावडे वय ५५ मु.पो. पूर, कनेरसर ता. खेड जिल्हा पुणे असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. थेरगाव वरून बिरदवडी नवीन रस्ता मार्गे पुर येथे जात असताना डम्पर वाहनाने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. सदरची घटना आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी सव्वा बाराच्या सुमारास घडली. सोबत त्यांचे पती नाथा यशवंत गावडे हे दुचाकी चालवत होते. ते जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालक अपघात करून पळून जात असताना नागरिकांना त्याला पकडले. सदरच्या रोडवर अपघाताची शृंखला वाढत चालली आहे.


Recent Politics News

More Politics News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue