हेद्रुज | शेतात गुरे सोडली ; २ गटात तुंबळ हाणामारी

July 16, 2024


पडीक शेतात जनावरे चरण्यास सोडल्या वरून दोन गटात लाठ्याकाठ्याचा व दगडांचा वापर करून तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 15 जुलै रोजी ) सकाळी खेड तालुक्यातील हेद्रुज गावात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अनिल सन्तु बच्चे (वय 42, रा. हेद्रुज, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत उर्फ गोट्या भिकाजी बच्चे, भिकाजी तात्याबा बच्चे, दीपक भिकाजी बच्चे (सर्व रा. हेद्रुज, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रशांत बच्चे याला अटक केली आहे. परस्पर विरोधात प्रशांत भिकाजी बच्चे (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश अनिल बच्चे, अनिल संतू बच्चे दिघेही रा. हेद्रुज, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


Recent Politics News

More Politics News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue