खंडणीसाठी अपहरण ; चाकण मधील एकास अटक

July 16, 2024


खंडणीसाठी तिघांनी मिळून एका भंगार व्यवसायिकाचे अपहरण केले. व्यावसायिकाकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात तीन लाख रुपये घेतले. ही घटना चाकण व मोशी मध्ये 12 जुलै आणि त्यानंतर घडली. यातील चाकण जवळील मेदनकरवाडी येथील एका आरोपीसह दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोशी येथून अटक केली. त्या दोघांकडून आठ लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळासाहेब बळीराम बांगर (वय 27, रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण पुणे), प्रवीण दत्तात्रय भालेराव (वय 29, रा. जयभवानीनगर, कोथरुड पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ब्रिजेश्याम राममिलन यादव यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यादव यांना भंगारचा व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला साडेतीन लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. तसेच यादव यांना मोशी येथे बोलावून घेतले. त्यानंतर तिथून त्यांना जबरदस्तीने कार मध्ये डांबून चाकण, नाशिक फाटा व मोशी येथे नेले. कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून वेळोवेळी ३ लाख रुपये घेतले. याबाबत यादव यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. खंडणी विरोधी पथकाने आरोपींचा ठाव ठिकाणा काढून आरोपींना अटक केली.


Recent Politics News

More Politics News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue