धानोरे | कंपनीला भीषण आग

July 17, 2024


खेड तालुक्यात आळंदी परीसरात मरकळ रस्त्यावरील धानोरे फाटा (ता.खेड) येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. सुदैवाने सदर आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आळंदी शहारा जवळ मरकळ रोड, धानोरे फाटा येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बुधवारी (दि. १७ जुलै २०२४ ) रोजी पहाटे तीन वाजता भीषण आग लागली होती, ही आग आटोक्यात आणण्यात आळंदी नगरपरिषद, पीएमआरडीए, पीसीएमसी अग्निक्षामक दलाला यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. कंपनीमध्ये आगी दरम्यान स्फोट होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरत होती. परिणामी अग्निशमन दलांकडून फोम मारा करून आग आटोक्यात आणली गेली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. सदर आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु कंपनीतील सर्व साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


Recent Politics News

More Politics News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue