चाकण | सोसायट्यांतील ओपन स्पेस मध्ये विकासकामे

July 17, 2024


चाकण शहरातील विद्याधाम सोसायटी येथील ओपन स्पेस विकास काम चाकण नगरपरिषद यांचे माध्यमातून होत आहे. येथील रस्ता व मोकळी जागा चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी 7/12 पत्रकी नोंद घेऊन त्यावर शासन योजनेतून विविध विकास कामे प्रस्तावित केली होती. आता सदरची विकासकामे प्रगतीपथावर असून मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांनी सांगितले की, शहरातील ओपन स्पेस हे शहराचे फुफुस असून त्यांचे जतन व संरक्षण करण्याचे काम चाकण नगरपरिषद करत आहे. सदर जागेवर लहान मुलांना खेळण्यासाठी व वृक्षारोपण नगरपरिषद करणार आहे. विद्याधाम सोसायटी ही स्वच्छ सर्वेक्षण सहभागी असून येथील मिळकत कर सह मोकळ्या जागेची कर आकारणी सोसायटीकडे 100% वसूल होते,त्यामुळे प्रामाणिकपणे कर अदा करणारे लोकांना व सोसायटी सार्वजनिक जागा येथे देखील चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी नगरपरिषद तत्पर आहे.


Recent Politics News

More Politics News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue