नवविवाहित दाम्पत्याचा आकस्मिक मृत्यू
August 13, 2024
चाकण एमआयडीसी मध्ये नोकरी करणाऱ्या व चार महिन्यांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य चाकण मधून चार दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी साकूर येथे गेले. तिथे त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. साकूर येथील बिरोबा माळ येथील वन विभागाच्या हद्दीतील निर्जनस्थळी त्यांचे मृतदेह मिळून आले.साकूर येथील वैभव दत्तात्रय आमले (वय २४) आणि स्नेहा वैभव आमले (वय २२) या दोघांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते चाकण एमआयडीसी मध्ये काम करत होते. चार दिवसांपूर्वी दोघेही गावी गेले. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास देवदर्शनाला जातो, असे सांगून गावात गेले होते. मात्र निर्जन स्थळी त्यांचे मृतदेह मिळून आले. घारगाव पोलीसांत तक्रार देण्यात आली असून या घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही. नानासाहेब जनार्दन आमले यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Recent Politics News
More Politics NewsDownload App
This article was generated using the WeReport app, download today and create your own article!
Report Issue